सावित्रीच्या लेकींच्या पहिल्या शाळेची दुरवस्था!

सावित्रीच्या लेकींच्या पहिल्या शाळेची दुरवस्था!

भिडे वाडा पहिली मुलींची शाळा येथुन स्त्री शिक्षणाचे बीजारोपण झाले.. देशातील पहिली मुलींची शाळा कुठे आहे.?'असा प्रश्न सहज आपल्याला कुणी विचारला तर लगेच उत्तर देता येईल-"भिडेवाडा पुणे!"परन्तु पुण्यात आल्यावर 'भिडेवाडा कुठे आहे.? असं तुम्ही विचारलं तर रिक्षावाले काका काय साध्या ज्येष्ठ व्यक्तीलासुद्धा पुण्यात भिडेवाडा कुठे आहे हे सांगता येणार नाही.पण तुम्ही 'दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर कुठे आहे.?हे जर विचारलात तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल.कारण 'भिडेवाडा' ही देशातील पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेतील दगडूशेठ हलवाई मंदिराच्या बरोबर समोरच आहे. पुणे येथील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आहे परंतु दुर्दैवाने ती आज जमीनदोस्त होत आहे, ज्या ठिकाणाहून स्त्री शिक्षणाचे बीजारोपण झाले त्या आणि याच वाड्यातून गुलामीच्या मुक्तीची विट सशक्त भारत उभारण्यासाठी देश मजबुतीसाठी रचायला सुरुवात केली, ज्याने स्री पुरुष दोघांना सुशिक्षीत केले आणि यावरच आज देश मजबुत उभा राहिला पण ज्या वाड्याने देश मजबुत केला त्याचीच एक एक वीट मात्र आज कोसळत आहे.या कडे आपण सर्वांनी लक्ष दायची गरज आहे

Prajyot  Fulsundar

Prajyot Fulsundar

Pimpalwandi , Junnar , Pune, Maharashtra

[ 5 Posts ]

Recent Comments